HW News Marathi
मनोरंजन

डॉ. अब्दुल कलामांचा असा होता कार्यकाळ…

भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म १९३१ साली झाला. श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी संपादन केली. नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली.

जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.

शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).

१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.

१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.

१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.

१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.

१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक

१९७९ ते ८० : थुंबा येथे चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)

१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त

१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.

१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.

१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.

१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.

१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

१९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.

२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.

२००१ : सेवेतून निवृत्त.

२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नववर्षाच्या स्वागतासाठी मॉलसह हॉटेल २४ तास सुरू ठेवा !

News Desk

आगमन बाप्पाचे | एसटी फुल्ल, खाजगी बसचे दर वाढले 

News Desk

गांधीजींना पहिल्यांदा कोणी म्हटले महात्मा ?

News Desk