HW News Marathi
मनोरंजन

जाणून घ्या… बालदिन १४ नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो

जगभरात बालदिन २० नोव्हेंबरला साजरा केला जातो. जागतिक पातळीवर दरवर्षी २० नोव्हेंबरला साजरा होणारा हा बालदिन १९५९ सालापूर्वीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जायचा. १९५४ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्याप्रमाणे, पहिल्यांदा बालदिन साजरा झाला. बालदिन साजरा करण्यामागचा महत्वाचा हेतू म्हणजे जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी असा होता.

भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू होते. बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्‍या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस भारतात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो.

बालदिन साजरा करताना नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलविण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण राहते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपिता महात्मा गाधींची आज १५० वी जयंती

News Desk

जाणून घ्या… धनत्रयोदशीचे महत्व !

News Desk

मराठी नाट्यसंमेलनाची वादाने सुरुवात

News Desk