HW News Marathi
Covid-19

नागरिकांनी नियम पाळा, कडक निर्णय घ्यायला भाग पाडू नका! – अजित पवार

मुंबई | “पुणेकरांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. नागरिकांनी नियम पाळा, कडक निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहेत. पुण्यात अजित पवार आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे या दोघांनी एकत्र येवून आज (४ जानेवारी) पत्रकार परिषदेत राज्य आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 

राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर मुबंई, ठाणे आणि नवी मुंबई पाठोपाठ पुण्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवारांनी सांगितला. परंतु, इयत्ता पहिले ते आठवीच्या शाळा ऑनलाईन सुरू असणार आहेत. पण, नववीची शाळा सुरू ठेवण्यात येणार असून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे ते शाळेत आल्यानंतर त्यांचे लसीकरण करणे सोपे होईल. त्यासाठी त्यांची शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सांगितले, असे अजित पवार म्हणाले. 

राज्यभरासाठी उद्या (५ जानेवारी) सकाळी नवे निर्बध जाहीर करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात विना मास्क विरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तर मास्क न घालणाऱ्यांना ५०० रुपये आणि थुकल्यास १००० रुपये दंड वसुल करण्यात येणार आहे. तसेच येत्या २० ते २५ दिवसात कोरोना विस्फोट होण्याची शक्यता वर्तवली अजित पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. पुण्याचा पोझिटिव्हिटी रेट हा १८ टक्क्यावर आहे, ही चिंताजनक असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ३० ते ३५ दिवसात कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती अजित पवार यांनी वर्तवली आहे.

प्रत्येक नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक

प्रत्येकाने लसीचा दुसरा डोस हा घेतलाच पाहिजे. पुण्यात ७४ टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ३६ टक्के लोक लस घ्यायची राहिलेली आहेत त्यांनी दुसरा डोस घेतलाच पाहिजे. ज्या नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत, त्यांना हॉटेल, बस, सिनेमागृह आदि ठिकाणी प्रवेश देण्यात येऊ नये, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. नागरिकांनी लवकरात लवकर लस घ्यावी, असे कळकळीची विनंत अजित पवार यांनी केले आहे. नागरिकांनी नियम पाळा, कडक निर्णय घ्याला भाग पाडू नका, असा इशारा देखील त्यांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेतून दिला आहे. तसेच राज्यातील ११ शहरात कोरोनाचा फैलाव होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोकुळवर सत्ता येताच ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याची पालकमंत्री सतेज पाटलांची घोषणा

News Desk

‘वर्क फ्रॉम नेचर’, ‘वर्क विथ नेचर’ संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद; एमटीडीसीच्या पुणे विभागाची सर्वोत्तम कामगिरी

Aprna

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंचा परळी दौरा रद्द

News Desk