HW News Marathi
Covid-19

राज्यात राजेश टोपेंच्या उपस्थितीत जालनातून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात

मुंबई। देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात आजपासून (३ जानेवारी) १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरुवात झाली. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयातून राजेश टोपे यांच्या उपस्थिती मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली.

जालनामध्ये टोपेंच्या उपस्थितीत १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात आली. या लसीकरण केंद्रात १०० मुलांनी लसीकरणासाठी नोंदी केली असून लस घेणाऱ्या मुलांची टोपेंनी विचारपूस केली. या मुलांना कोव्हॅक्सीन हीच लस देण्यात आली. जालना लसीकरण केंद्रात मुलांमध्ये उत्सहाचे वातावरण दिसून आले. सध्या राज्यात ६५० लसीकरण केंद्रावर मुलांना लक्ष देण्यात येणार आहे. तर राज्यात जवळपास ८ हून अधिक लाख मुलांनी कोविन अॅपवर १ जानेवारीपासून लसीकरणासाठी नोंदी सुरू करण्यात आली होती. 

मुंबईत ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात काल (२ जानेवारी) ११ हजार, ८७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात मुंबईत ८ हजार ६३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या ५० रुग्णांचा यात समावेश आहे. तसेच २४ तासांत ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना रुग्ण वाढीचा वेग शनिवारी (१जानेवारी) च्या तुलनेत रविवारी (२जानेवारी) २७ टक्क्यांनी वाढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ९०० वर

News Desk

ठाकरे सरकारचा निर्णय! राज्यातील सर्व आशा सेविकांना २ हजार, तर आशा गटप्रवर्तकांना ३ हजार मानधन

News Desk

‘हिवरेबाजारचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न’ची पंतप्रधान मोदींनी देखील घेतली दखल!

News Desk