चिंतादायक! देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६८ हजार ८३३ कोरोना रुग्णांची नोंद

चिंतादायक! देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६८ हजार ८३३ कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात २ लाख ६८ हजार ८३३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४०२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी ६८ लाख ५० हजार ९६२ ऐवढी झाली आहे. सध्या देशात १४ लाख १७ हजार ८२० सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर १ लाख २२ हजार ६८४ रुग्ण कोरोनामुख्त झाले आहेत. देशात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा १६.६६ टक्क्यावर पोहोचला आहे. तर दुसऱ्या बाजुला देशात ६ हजारपेक्षा जास्त ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आहे. आणि देशात ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत देखील वाढ होत आहे. सध्या देशातील सर्व राज्यांना मिळून आतापर्यंत ६ हजार ४१ ओमायक्रॉनचे रुग्णांची नोंद आहे.

देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्य ५.०१ टक्क्यांची वाढ होताना दिसत आहे. तर सध्याचा रिकव्हरी रेट हा ९४.८३ वर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी दिली आहे. देशाता दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट १६.६६ वर पोहोचला. याआधी हा रेट १४. ७ टक्क्यावर होता. आणि आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट वाढून १२. ८४ टक्क्यांवर योवून पोहोचला आहे. देशात आतापर्यंत १५६ कोटी २ लाख ५१ हजार ११७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर देशात काल (१४ जानेवारी) ५८ लाख २ हजार ९७६ लसीचे डोस दिले आहेत.


Next Story
Share it
Top
To Top