HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोनाची नोंद

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा संसर्ग वाढ आहे. मात्र, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५२५ जणांचा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटीवर येवून पोहोचली आहे. देशाता कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ८९ हजार ४०९ ऐवढ्या लोकांनी आपले प्राण गमावले आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट १७. ७८ टक्के ऐवढा झाला आहे. सध्या देशात २१ लाख ८७ हजार २०५ कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. तर ४ लाख ८९ हजार ४०९ लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

दरम्यान, देशात कोरोना लसीकरणाची मोहिमेअंतर्गत १६१ कोटी ९२ लाख ८४ हजार २७० नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल आहे. देशात काल (२२ जानेवारी)  ७१ लाख १० हजार ४४५ डोस देण्यात आली.  कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशातील अनेक राज्यांनी पुन्हा एकदा निर्बंध लावले आहे. गेल्या काल (२२ जानेवारी राज्यात कोरोनाच्या ४६ हजार ३९३  नव्या रुग्णांची भर पडली असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल ३० हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात काल ४१६ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात काल  आतापर्यंत २ हजार ७५९ ओमायक्रॉनची नोंद झाली आहे. त्यापैकी १ हजार २२५ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. राज्यात काल ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.९१ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७० लाख ४० हजार ६१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओमायक्रॉनचा जगातील पहिला बळी ब्रिटनमध्ये; पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दिली माहिती

News Desk

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट!

News Desk

कोरोना संपल्यावर प्रसार माध्यमांशी बोलणार | अजित पवार

News Desk