HW News Marathi
Covid-19

खुर्चीत बसून गांजा पित बोलणे सोपे आहे; किशोरी पेडणेकरांचा विरोधकांना टोला

मुंबई | मुंबईत कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज (८ जानेवारी) बीकेसी कोविड सेंटरची पाहणी केली. मुंबईतील वाढता कोरोना संसर्ग पाहता नागरिकांनी घाबरण्यापेक्षा काळजी घ्यावी, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली आहे. खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते. विरोधी पक्षनेतेच जनतेमध्ये कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबतची भीती वाढवत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

बीकेसी कोविड सेंटरमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ‘मुंबईत जे २० हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्यातील १७ हजार रुग्णांना सौम्य लक्षण आहेत. याशिवाय दिलासादायक गोष्ट अशी आहे की त्यापैकी एकही आईसीयू पेशंट नाही. संकट कोणतेही असो, आम्ही घाबरत नाही. बीएमसीची पूर्ण तयारी आहे. विरोधी पक्षातील नेत्यांसाठी खुर्चीत बसून गांजा पित बोलणे सोपे आहे. पण परिस्थिती तपासून पाहता बीएमसी योग्य काम करत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू नये’,अशी टीका त्यांनी केली आहे.

लॉकडाऊन होईलच असं म्हंटलेलं नाही

मुंबईसह राज्यामध्ये दिवसोंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे निर्बंध आणि लॉकडाउनच्या चर्चा सुरु आहेत. यावरून पेडणेकरांना प्रश्न विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, कोरोनाची संख्या स्थिर आहे. त्यामुळे सध्या तरी लॉकडाउन लावण्याचा विचार नाहीये. २० हजार केसेस समोर आल्या तर मुंबईत लॉकडाऊन होईलच असे मी कधीच म्हटले नाही. पण लॉकडाउन नको असेल तर नागरिकांनी काळजी घ्यायलाच हवी, असंही त्या म्हणाल्या.

कोविड केंद्रांचा वापर केवळ कमाईसाठी : किरीट सोमय्या

दरम्यान, भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोविड केंद्रांच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर आरोप केला होता. सोमय्या म्हणाले, सत्ताधारी नेते हे कोविड केंद्रांचा वापर केवळ कमाईसाठी करत आहे. ते केवळ जनतेमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निर्माण करत आहेत. आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी आणि कोविड केंद्रांमधून पैसा कमवण्यासाठी लोकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवली जात आहे आणि लॉकडाऊनची धमकी दिली जात आहे. मात्र, मी लवकरच कोविड केंद्रांच्या नावाने सुरू असलेले घोटाळे बाहेर काढणार आहे. तसे पुरावेही ते जनतेला दाखवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगावमधील ‘कोरोना’चा मृत्यूदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स !

News Desk

“सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर ५००० प्रवास भत्ता द्या”, भाजपची मागणी

News Desk

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक!

News Desk