सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

बारामती। राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खासदार सुळे यांनी स्वतः याबाबतचे ट्विट करत माहिती दिली असून आपण व सदानंद व्यवस्थित असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

राज्यात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. अशातच खासदार सुळे या देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून त्या नुकत्याच मंत्री जयंत पाटील यांच्या मुलाच्या तसेच हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील व निहार ठाकरे यांच्या विवाहाला उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हा आकडा वाढतोय का अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अधिवेशनातील या ५० जणांना कोरोनाचा संसर्ग


दरम्यान, याआधी काल (२८ डिसेंबर) राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. तर त्याआधी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी हे देखील कोरोना बाधित झाले होते. याशिवाय हिवाळी अधिवेशनातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अधिवेशनाच्या समारोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनातील जवळपास ५० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. या ५० जणांमध्ये मंत्री व आमदारांसह इतरांचाही समावेश आहे.


Next Story
Share it
Top
To Top