राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कोरोनाची लागण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पवार यांनी स्वतः आज (२४ जानेवारी) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. "माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरू आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी", असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.शरद पवारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू देखील कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील अशा अनेकांचा समावेश आहे.


Next Story
Share it
Top
To Top