HW News Marathi
Covid-19

बीडमध्ये इंदुरीकर महाराजांच्या जाहीर किर्तनाला हजारोची गर्दी; कोरोना नियमांचे उल्लंघन

बीड | राज्यासह बीड जिल्ह्यात कोरोनाची दिवसेंदिवस वाढती रुग्ण संख्या आणि ओमायक्रॉनचा धोका, यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे धार्मिक, राजकीय कार्यक्रमाला बंदी घालण्यात आलीय. मात्र, ही बंदी फक्त नावा पुरतीच आहे का ? असा प्रश्न हा कार्यक्रम पाहून आपणास पडेल. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील, कोरोणाने हातपाय पसरायला सुरुवात केलेली असताना, बीडच्या नांदुरघाट गावात निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाला हजारो लोक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टंसिंग आणि कोरोणा नियमांचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी संयोजक मंडळी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

शासनाने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने, नियमावली जाहीर करत निर्बंध लादले आणि शाळा महाविद्यालय बंद केले. मात्र, दुसरीकडे अशा धार्मिक अन् राजकीय कार्यक्रमाला हजारोची गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी आहे. सरकारच्या नाकावर टिच्चून निवृत्ती इंदुरीकर महाराज मोठमोठे कीर्तन घेत आहेत व किर्तनाला हजारोंचा जनसमुदाय विना मास्क एकत्र दिसत आहे. तरी देखील शासन-प्रशासन मूग गिळून गप्प आहे का ? विशेष म्हणजे नांदुरघाट येथे पोलीस चौकीच्या समोर बाजार तळावर हजारो लोक एकत्र झाल्याचे दिसत असताना देखील, पोलिसांनी डोळेझाक केली. यामुळे संताप व्यक्त केला जात असून या जाहीर किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केले होते. त्यामुळे राजकीय नेत्यांना कोरोना नियमात सूट दिलीय का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांविरोधात संसदेत काँग्रेसची विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस

News Desk

आता कोणाला सांगणार ‘ही’ राजकारण करण्याची वेळ नाही !

News Desk

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्येत लक्षणीय घट, तर मुंबईत केवळ ६७६ नवे रूग्ण

News Desk