पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या 'त्या' घटनेनंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना आढावा बैठकीत व्यक्त केला खेद

पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या त्या घटनेनंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना आढावा बैठकीत व्यक्त केला खेद

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ जानेवारी रोजाचा पंजाब दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता. यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे पंजाब सरकारवर सर्व स्तरातून टीका केली होती. याप्रकरणानंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी काल (१३ जानेवारी) कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील बैठकीत उपस्थित होते. चन्नी म्हणाले, "पंतप्रधानजी, तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहात. तुमच्या पंजाब दौऱ्यादरम्यान जे काही झाले त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो," असे ते म्हणाले.

दरम्यान, चेन्नींनी पंतप्रधानांसाठी शायरीही म्हणाले, "तुम सलामत रहो कयामत तक और खुदा करे कि कयामत ना हो." पंतप्रधानांचा ५ जानेवारी रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथे सभेसाठी निघाले होते. तेव्हा पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलनकांनी अडवला होता. यामुळे पंतप्रधानांना भटिंडामधील पुलावर १५ - २० मिनिटे ते अडकले होते. यानंतर पंतप्रधानांनी त्यांचा पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द केले.

पंतप्रधानांनी ५ जानेवारी रोजी फिरोजपूर येथील एका सभेसाठी निघालेल्या त्यांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी आडवला. त्यामुळे मोदींना भटिंडामधील पुलावर १५ ते २० मिनिटे अडकले होते. यानंतर पंतप्रधानांनी त्यांचा पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले. पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ होणार होता. परंतु, पंप्रधानांनी दौरा रद्द केल्यामुळे ही सर्व विकासकामे लांबणीवर गेली.

Next Story
Share it
Top
To Top