पुण्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांची बैठक; कडक निर्बंधावर होणार चर्चा

पुण्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांची बैठक; कडक निर्बंधावर होणार चर्चा

पुणे | गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (१५ जानेवारी) कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकीत पुणेकरांवरांच्या निर्बंध अधिक कठोर होण्याच्या चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. अजित पवार कोणते निर्णय घेणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागेल आहे.

गेल्या २४ तासात पुण्यात १० हजार ७६ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात ५० हजार सक्रीय रुग्ण आहेत. अजित पवार यांनी आज दुपारी ४ वाजात पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित असणार आहे. या बैठकीत पुणेकरांसाठी बूस्टर डोस आणि लसीकरणावर देखील चर्चा होणार असल्याचे बोले जाते.

पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात १९७ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत २३८ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आता १ हजार ६०५ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद १ हजार ६०५ तर ८५९ रूग्णांना मिळाला डिस्चार्ज मिळाला आहे. तर ओमायक्रॉन पिंपरी चिंचवडमध्ये ३२ रुग्ण आढळून आले आहेत.
Next Story
Share it
Top
To Top