HW News Marathi
Covid-19

भारतीयांच्या चिंतेत वाढ! गेल्या २४ तासांत देशातील कोरोना संख्या १ लाखांवर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचं म्हंटलं आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेत वाढ होत आहे. अशातच गेल्या २४ तासांत भारतात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळले आहेत. मागील प्रकरणांपेक्षा रुग्णसंख्येत २८ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह आतापर्यंतची मृत्यू संख्या आता ४ लाख ८३ हजार १७८ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३० हजार ८३६ रुग्ण बरे झाले आहेत.

जगभरात कोरोनाची तिसरी लाट थैमान घालत असताना देशातही कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. वाढती रुग्णसंख्या ही एक चिंतेची बाब आहे. तर काल (६ जानेवारी) रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळले आहेत. केवळ या तीन राज्यांमध्ये ६० टक्के नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या देशात ३ लाख ७१ हजार ३६३ सक्रिय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे लसीकरण मोहिम देखील वेगाने सुरु आहे. आतापर्यंत देशात १४९ कोटी ६६ लाख नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, देशात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. देशातील पॉझिटिव्हीटी रेट हा ७.७४ टक्के इतका झाला आहे.  देशातील ओमायक्रॉनचा संसर्गही अधिक वेगाने होत असून ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येने आता तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असून ही संख्या आता ८७६ वर पोहोचली आहे. त्यानंतर दिल्लीत ४६५ रुग्ण आढळले आहेत, तर राजस्थानमध्ये २९१, केरळमध्ये २८४ आणि गुजरातमध्ये २०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनाने निधन

News Desk

लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता, डॉ. रणदीप गुलेरियांची माहिती

News Desk

महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू राहणार? जाणून घ्या…

News Desk