…अन् मुलानं केला वडिलांचा खुन

…अन् मुलानं केला वडिलांचा खुन

कोल्हापूर - दारूड्या मुलानं स्वतःच्या वडिलांची चाकूनं भोसकून खुन केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर शहरातील विक्रमनगर इथल्या शाहू कॉलनीत घडली आहे. पिरसाहब मुल्ला (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रफिक मुल्ला (वय 27) हा रोज दारू पिऊन घरी यायचा. त्याच्या त्रासाला कुटुंबिय वैतागले होते. रविवारी मध्यरात्रीही रफिक दारू पिऊन घरी आला. मात्र, त्याच्या वडिलांनी घराचा दरवाजाच उघडला नाही. त्याचा राग मनात धरून रफिकनं वडिलांवर चाकूनं पोटात, छातीवर सपासप वार केले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरमी राजाराम पोलिसांनी रफिकला अटक केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top