अवैध दारु घेऊन जाणा-या जिपला पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन पकडले

अवैध दारु घेऊन जाणा-या जिपला पोलिसांनी  सिनेस्टाईलने पाठलाग करुन पकडले

उत्तम बाबळे

नांदेड अवैध विक्रीसाठी दारु घेऊन भरधाव वेगात जात असलेल्या एका अलीशान जिपचा सिनेस्टाईल पाठलाग करुन विशेष पोलीस पथकाने नांदेड नागपूर महामार्गावर पकडले असून चालकासह जिप व ८६,४००/- रुपयाची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाला एका अलीशान जिपद्वारे अवैध विक्रीसाठी दारु घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन पथक प्रमुख सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर व पथकाने नांदेड - नागपूर महामार्गावर दि.११ जुलै २०१७ रोजी पाळत ठेवली.नांदेड शहरालगतच्या आसना नदीजवळीट वळण रस्त्यावर थांबून त्या जिपची प्रतिक्षा करत असतांना सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान नांदेड कडून नागपूरकडे जाणा-या महामार्ग दिशेने एम. एच. २६ ए.के. ६०८९ क्रमाकांची महिंद्रा बोलेरो जीप भरधाव वेगाने आली.तिला थांबविण्याचा पथकाने प्रयत्न केला असता पोलीस अडवित असल्याचे समजल्याने जिप चालकाने त्या जिपची गती अधिक केली व सुसाट वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला.परंतू पथकाचे चालक देवकते यांनी जीव धोक्यात घालून त्या जिपचा सिनेस्टाईल पाठलाग केला व भोकर फाट्या जवळील कोळीवाडा धाब्याजवळ तिला पकडले.चालक विठ्ठल भुजंगा बोचरे रा. पाथरड ता. मुदखेड यास ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने या जिप मधील १८ बाॅक्स देशी दारु अवैध विक्रीसाठी मनाठा ता.हदगाव येथे घेऊन जात असल्याचे सांगीतले. जिप चालक,जिप व ८६,४००/- रुपयाची ती अवैध दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच सहा.पो.नि.ओमकांत चिंचोळकर यांनी फिर्याद दिल्यावरुन अर्धापूर जि.नांदेड पोलीसात त्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१० जुलै रोजी मुखेड मध्ये मटका व अवैध दारु विक्री अड्डे अशा चार ठिकाणी या पथकाने छापे मारुन २८ आरोपींसह लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याने अनेकांचे धाबे दणानले असून या कारवाईचे देखील काैतूक होत आहे.


Next Story
Share it
Top
To Top