आईच्या कुशीतून निसटून मृत्युच्या कुशीत

उत्तम बाबळे

नांदेड :- भोकर येथे चार चाकी वाहनातून प्रवास करत असलेल्या आईच्या कुशितून निसटलेल्या एका १ वर्षीय बालकाचा त्याच वाहनाच्या मागच्या चाकाखाली पडून जागीच दुर्दैवी मृत्यु झाला असून २ मे रोजी झालेल्या ह्रदय हेलावून टाकणा-या या अपघाताविषयी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तर रात्री उशीरा त्या वाहन चालका विरुद्ध भोकर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरखेड जि.यवतमाळ येथील रहिवासी असलेले बालाजी मुळे हे पत्नी ज्योती मुळे व १ वर्षीय त्यांचा मुलगा श्रेयश यांच्या समवेत भोकर येथे सासरवाडीला एका नातेवाईकाच्या विविह सोहळ्यासाठी आले होते.हा विवाह सोहळा आटोपुन २ मे २०१७ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान एका चार चाकी (जिप) वाहनात बसून माै.वाकद ता.भोकर येथील नातेवाईकाकडे जात असतांना भोकर शहरातील नांदेड रस्त्यावरील आसावा जिनिंगच्या गेट जवळ त्या वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक मारले.यामुळे त्या वाहनाचे दार उघडले व दाराजवळ मध्य आसनावर बसलेल्या ज्योती बालाजी मुळे यांच्या कुशीत बसलेसे १ वर्षीय बाळ श्रेयश आईच्या हातातून निसटले आणि त्याच वाहनाच्या माघील चाकाखाली पडले.वाहन चालूच असल्यामुळे चाक बाळावरुन गेले व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला.आई वडीलांच्या अगदी डोळ्यासमोर निरागस बाळाचा मृत्यु झाल्याचे पाहून उपस्थितांसह अनेकांचे ह्रदय हेलावून गेले.हे पाहून बालाजी मुळे व ज्योती मुळे हे तर जागीच बेशुद्ध झाले.भोकर येथील शासकिय रुग्णालयात या मयत बाळाचे शवविच्छेदन करण्यात येऊन आजोळीच अंत्यसंस्कारही करण्यात आहे.शोकाकूल आई वडीलांनी उशीरा पर्यंत फिर्याद दिली नसल्याने दिवसभर गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.परंतू रात्री उशीरा या मयत बाळाचे आजोबा रमेश कामाजी कल्याणकर (५०)रा.राम मंदीराजवळ,भोकर यांनी फिर्याद दिल्यावरुन त्या चार चाकी वाहनाच्या चालकाविरुद्ध बाळाच्या मृत्युस कारणीभुत झाल्याचा गुन्हा भोकर पोलीसांत दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सी.एम.साखरे हे करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top