नाशिक शहरातील मखमलाबाद येथील गंगाधरवाडीत आठ वर्षाच्या मुलाची कोयत्याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परीसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकऱणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गंधारवाडी परिसरात राहणारे दशरथ सोनू खराटे यांच्या कुटुंबातील जावई संशयित मोतीराम बदादे याने राहत्या घरामधून सासू आणि मेव्हणीच्या आठ वर्षीय मुलाला दुचाकीवर घेऊन आला.
रामवाडीकडे जाणा-या मुख्य रस्त्याच्या बाभळीच्या जंगलात दोघांना आणले आणि त्यांचा धारधार शस्त्राने निर्घृण खून केला. या हल्ल्यात मंदाबाई दशरथ खराटे (५५) नैतिक विशाल लिलके (८) त्यानंर मोतीराम याने दुचाकीवरून पुन्हा सासूचे घर गाठले आणि सासरे दशरथ सोनू खराटे यांना सासूची लूटमार होत असल्याचे खोटे सांगून दुचाकीवर बसवून आणले.घटनास्थळावर आणले त्यानंतर त्यांना उतरवून लूटमार करणा-यांनी सासूला जंगलात नेल्याचे खोटे सांगितले. त्यांनंतर त्यांनाही जंगलात नेले आणि त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला या हल्यात ते गंभीर जखमी झाले होते तरी देखील त्यांनी जखमी अवस्थेत पळ काढला आणि पोलिस ठाण्यात जाऊन झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटना स्थळी गेले मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाले होते याप्राकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.