आरोपींच्या तुरूंगातील बर्थडे पार्टीमुळे 10 पोलीस निलंबित  

आरोपींच्या तुरूंगातील बर्थडे पार्टीमुळे 10 पोलीस निलंबित  

अक्षय कदम

तुमसर - भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे पोलीस ठाण्यात हत्याप्रकरणातील आरोपींनी केलेल्या बर्थडे पार्टीप्रकरणी दहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

तुमसर येथील पोलीस ठाण्यातील कारागृहात हेमंत उके हत्या प्रकरणातील आरोपींनी वाढदिवस साजरा केल्याची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. त्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. भंडाऱ्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने याप्रकरणाची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर आज याप्रकरणी १० पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हेमंत उके हत्याप्रकरणातील आरोपींनी पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि पोलिस शिपायांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला होता. या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, आजच्या कारवाईने या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे सिद्ध झाले आहे.


Next Story
Share it
Top
To Top