उल्हासनगरच्या शिवसेना शहर प्रमुखाला अटक

उल्हासनगरच्या शिवसेना शहर प्रमुखाला अटक

गौतम वाघ

उल्हासनगर - महापालिकेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागताच नागरी सुविधा पुरविण्याचा आव आणणाऱ्या शिवसेनेच्या उल्हासनगरच्या शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरात गेल्या अनेक महिन्यापासून पाणी टंचाई असल्या कारणाने शिवसनेच्या वतीने काही दिवसापूर्वी डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयावर आंदोलन करीत कार्यलयाची तोडफोड केली होती. त्यावेळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या नेत्या विरोधात तोडफोड, व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार म्हणून उल्हासनगरच्या शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह रमेश चव्हाण, राजेंद्र शाहू, संदीप गायकवाड असे चार जणांना मानपाडा पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेली १० वर्षापासून शिवसेनेची सत्ता असूनही हे आंदोलन करावे लागल्याची चर्चा नागरिक करीत असून निवडणूकी साठी केलेला स्टंट असल्याची टीका विरोधक करीत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top