गौतम वाघ
७८ लाख रुपये किमतीचे 2 किलो 886 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत
उल्हासनगर-उल्हासनगरमधील मणप्पुरम गोल्ड कार्यालयातील घरफोडी प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने तीन आरोपीना अटक केली असून ७८ लाख रुपये किमतीचे किमतीचे 2 किलो 886 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत,ठाणे पोलिसांच्या उल्हासनगर गुन्हे शाखा ४ ने हि कामगिरी केली असून,या गुन्ह्यातील आणखी आरोपींचा शोध अद्याप जारी असल्याचे ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग ठाणे आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली ... उल्हासनगरमधील लालचक्की भागात मणप्पुरम गोल्ड कार्यालयात तारण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांची २४ डिसेंबर रोजी चोरी झाली होती ,भिंतीला भगदाड पाडून चोरांनी या कार्यालयात प्रवेश करून घरफोडी केली होती,या घरफोडीत चोरांनी ७ करोड २२ लाख ४० हजार ३०५ रुपयाचे २८ किलो ६८६ वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले होते ,ठाणे पोलिसांच्या उल्हासनगर गुन्हे शाखा ४ ने या प्रकरणात तपास करून झारखंड येथून मुस्तफा शेख याला अटक करून ७८ लाख रुपये किमतीचे किमतीचे २ किलो ८६२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले, तसेच त्याला या चोरीत करणाऱ्या कमरुउद्दीन शेख याला नवी मुंबई तील तुर्भे येथून अटक केली तर तिसरा आरोपी मनोज साऊंद याला ठाण्यातून अटक करण्यात आली ,या गुन्ह्यातील आणखी आरोपींचा शोध अद्याप फरार आहेत ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग ठाणे आयुक्त कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली .