[embed]https://youtu.be/Xz5Zw-o9a78[/embed]
उल्हासनगर - शीख समुदायाच्या दोन गटांत झालेली तुफान हाणामारी सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. उल्हासनगरच्या मच्छी मार्केट आणि शासकीय रूग्णालयात या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती, या दोन्ही ठिकाणच्या घटना या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या आहेत. पोलिस या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारावर कारवाई करत आहेत.
उल्हासनगरच्या कॅम्प 5 मध्ये दोन दिवसांपुर्वी ही घटना घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका पूजा कौर लबाना आणि त्यांच्या विरोधकांमध्ये ही हाणामारी झाली होती. लबाना यांच्या नातलगांना विरोधी गटाच्या लोकांनी स्कॉर्पिओ गाडीनं धडक देऊन जखमी केले होते. यावेळी शासकीय रूग्णालयात पोलिस आणि डॉक्टरांनाही धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेत अकरा जण जखमी झाले होते. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुूरू आहेत. हे एक्सक्लुसिव फुटेज आम्ही www.mahabatmi.com च्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत. यामागे केवळ सत्य घटना दाखवणे हाच आमचा हेतू आहे.