कल्याणः एकावर एक तीन अंडरवेअर आणि त्यावर तब्बल सात शर्ट- पॅण्ट घालून एक भामटा मुंबई-ठाण्यातल्या कडाक्याच्या उन्हातून फिरायचा. बेरोजगार तरुणांना गंडा घालण्यासाठी तो हा मार्ग अवलंबित होता. बड्या कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून तो विविध तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवित असे. एकाला भेटून झाले की एक ड्रेस उतरवून ठेवी आणि पुढे दुसऱ्याला भेटायला जात असे. तिथून पुढे गेला पुन्हा नवा ड्रेस, असे या कपड्यांमागचे गमक होते. अखेर कल्याण येथील बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मोहम्मद तारिक खान असे या भामट्याचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. पोलिसांनीत्याच्याकडून २६ पासपोर्ट, विविध कंपन्यांचे लेटरहेड,कागदपत्रे तसेच 1 लाख 29 हजार रुपयांची रोकडहस्तगत केली आहे. दरम्यान, तारिक कंपन्यांच्या नावानेपत्रके छापून ते वितरित करत गरजू लोकांची फसवणूक करायचा त्याला पोलिसांनी अटक केली, तेव्हा यांनी एकावर एक असे सात शर्ट पॅन्ट अंगावर चढवले होते. एवढेच नव्हे तर 3 अंडरवेयर घातल्याचे दिसून आले. थंडी ताप आल्याने हा प्रकार केल्याचे त्याने सांगितले.मात्र आपण पकडले जाऊ नये आणि लुबडणूक करणे सोयीचे व्हावे यासाठी त्याने हा उपद्व्याप केल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी बाजारेपठ पोलिस स्थानकात प्रेरणा कन्सल्टन्सी कंपनीचे मालक प्रकाश बोडके यांनी खान भाई नावाच्या इसमाने आपल्या कंपनीचा लोगो वापरत परदेशात नोकरीचे आमिष दाखवत पाच जणांना मिळून लाखोंचा गंडा घातल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारी नुसार पोलिसांनी खान भाई नावाच्या इस्माविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला. या आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता माहिती नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे आवाहन उभे ठाकले होते. अखेर मोबाईल नंबर मिळाल्याने या नंबरच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला. अखेर या खान भाईपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.