कपिल शर्मावरील एफआयआरला स्थगिती

कपिल शर्मावरील एफआयआरला स्थगिती

मुंबई गोरेगावमधील फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी कॉमेडीयन कपिल शर्माविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या एफआयआरला हायकोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली आहे. तर पुढच्या पाच आठवड्यांत हे प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश हायकोर्टाने पालिकेला दिले आहेत. गोरेगावमधील ‘डीएलएच एनक्लेव्ह’ या 18 मजली इमारतीमध्ये कपिल शर्मा आणि बॉलीवूड अभिनेता इरफान खान राहत आहेत. त्यांनी आवश्यक ती परवानगी न घेता फ्लॅटमध्ये अतिरिक्त बांधकाम केल्याचा आरोप करत महापालिकेने या दोघांनाही एप्रिल आणि सप्टेंबर 2016 मध्ये नोटीस बजावली आणि दोघांनाही बांधकाम पाडण्यास सांगितले. या दोघांनी या नोटीसला हायकोर्टात आव्हान दिले. काल या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत महापालिकेने बजावलेली नोटीस मागे घेतल्याची माहिती हायकोर्टाने दिली.


Next Story
Share it
Top
To Top