कुख्यात अल्पवयीन गुंडाचा शालेय विद्यार्थ्यांनी केला खून

कुख्यात अल्पवयीन गुंडाचा शालेय विद्यार्थ्यांनी केला खून

  • चाकूने वार करून केला खून

नाशिक : पंचवटी परिसरात प्रचंड दहशत निर्माण करणारा कुख्यात अल्पवयीन गुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याचा तिघा अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांनी खून केला आहे.

भरदिवसा चाकूने गळ्यावर वार करून पप्याचा खून करण्यात आलाय. या निमित्तानं नाशिक शहरातील वाढती बालगुन्हेगारी पुन्हा उघड झालीय. काही दिवसांपूर्वी, ओझर येथील शाळेत नववीच्या मुलाने मैदानावर वर्ग मित्राचा खून केला होता. आता पाप्याच्या हत्येच्या घटनेने शाळकरी मुलांची वाढती गुन्हेगारी मानसिकता पुन्हा एकदा ढळढळीतपणे समोर आली आहे.


Next Story
Share it
Top
To Top