गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपींना 14 दिवसांची कोठडी

गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपींना 14 दिवसांची कोठडी

एस आऱ मोहिते, सरकारी वकील

मुंबई - कायदेशीररित्या बंदी असलेल्या गर्भलिंग निदान चाचणी मात्र सर्रासपणे सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात अशाप्रकारे गर्भलिंग निदान करतांना रंगेहाथ पकडलेल्या डॉ. मधुककर शिंदे व त्याच्या दोन सहकाऱ्यांना दौंड न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आरोपींच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची सरकारी वकिलांची मागणी मात्र न्यायालयानं फेटाळली आहे.

मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी डॉ. शिंदे व त्याच्या दोन सहकाऱ्यांना दौंड न्यायालयात हजर करण्यात आले . यावेळी सरकारी वकील एस आर मोहिते यांनी आरोपींनी दौंड, बारामती, इंदापूर, फलटण येथे गर्भलिंग निदान केल्याबाबत तपासात समोर येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी हे 3 महिलांचे गर्भलिंग निदान करीत असतांना रंगेहाथ पकडल्याचे सांगितले. महिलांकडे तपास केला असता आरोपींनी स्वतःला शासकीय पथक असल्याचे सांगून गर्भलिंग निदान करण्याकरिता बोलावून त्यांचेकडून रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे अॅड. मोहिते यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत आरोपींकडे अधिक तपास करणे आहे तसेच फरार घर मालक व तपासात निष्पन्न झालेले दोन आरोपींची माहिती घेऊन त्यांना अटक करायची असल्यानं सदर आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी केली होती. यावर आरोपींचे वकील आर के धायगुडे व ए एस महाजन यांनी जोरदार युक्तिवाद करत गुन्ह्यामध्ये पुरेसा तपास झाला असल्याने आरोपींना वाढीव पोलिस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकत आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. ग्रामीण भाग असो की शहरी भाग गर्भलिंग निदान चाचणीबाबतचे कायदे आणखी कठोर करण्याची मागणी केली जात आहे.


Next Story
Share it
Top
To Top