गुन्हेगारांना फोडून काढा-विश्वास नांगरे-पाटील

कोल्हापूर राजर्षीशाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीत अवैद्य धंदे चालू देऊ नका... अवैद्य धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना फोडून काढा असे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस अधिकऱ्यांना दिलेत. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अवैध धंदे फोफावल्याने विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यासोबत महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यात जाऊन ते स्वतः पोलिसांच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत तर नागरिकांशी संवाद साधून मते जाणून घेत आहेत. आज त्यांनी कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी करत अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावलेत.


Next Story
Share it
Top
To Top