गोलंदाज बाद होतात तेव्हा, एकाच्या घरी चोरी, एकाच्या घरावर हल्ला

नागपूरः भारतीय क्रिकेट संघातील दोन वेगवान गोलंदाजावर एकाच दिवशी मोठे संकट आले. नागपूर येथे राहणाऱ्या उमेश यादव याच्या घरी चोरी झाली तर मोहमंद शमी याच्या घरावर काहींनी हल्ला चढवला. या घटनेमुळे क्रिकटे विश्वासह त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

नागपूर येथील शंकनगर परिसरात राहणाऱ्या उमेश यादव याच्या घरावर चोरांनी डल्ला मारला. त्याच्या घरातून 45 हजारांची रोकड व दोन मोबाइल फोनची चोरी झाली. अतिशय सुरक्षित असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावर चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेमध्ये मोहंमद शमी याच्या घरावर जमावाने हल्ला केला आहे. रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वारासोबत झालेल्या वादानंतर जमावाने शमिच्या घरावर हल्ला केला. जमावाने शमीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली.


Next Story
Share it
Top
To Top