गोव्यातील कार अपघातात पुण्यातील एक ठार

म्हापसा (गोवा)- पर्यटकांचे माहेरघर असणाऱ्या गोव्यात कार उलटून झालेल्या अपघातात पुण्यातील एका इसमाचा मृत्यू झाला. कळंगुट भागात गुरुवारी पहाटे हा अपघात झाला. यात मृताचा मित्र जखमी झाला आहे.

विमल नगर पुणे येथील रहिवाशी पूर्वेश शहा (३७) मित्र लोकनाथ प्रसाद (पुणे) याच्यासोबत होंडा अ‍ॅक्वॉर्डकारने कळंगुटच्या दिशेने जात होता. बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या पूर्वेशचे वाहनावरील नियंत्रण सुटून ते रस्त्याशेजारच्या झाडावर आदळले. शेजारी बसलेल्या लोकनाथ याने कळंगुट पोलिसांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोघानांही वाहनातून बाहेर काढले व आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे पूर्वेश याला मृत घोषीत करण्यात आले. या वेळी केंद्रावर लोकनाथची मद्यार्क चाचणी घेण्यात आली. तो दारूच्या नशेत असल्याचे आढळले.

झाडाला धडक मारण्यापूर्वी या कारने एका पादचाऱ्यासुद्धा धडक देऊन जखमी केले होते. जखमी पादचाऱ्यावर नंतर प्राथमिक उपचार करुन त्याला घरी पाठवण्यात आले.


Next Story
Share it
Top
To Top