चकली चोरी केली म्हणून लहान मुलांच्या गळ्यात चप्पलाचे हार घालून धिंड...

चकली चोरी केली म्हणून लहान मुलांच्या गळ्यात चप्पलाचे हार घालून धिंड...

गौतम वाघ

त्या दोन नराधमाना पोलिसांनी केला गजाआड

उल्हासनगर :- दुकानात चकली चोरी केली म्हणून दोन लहान मुलांना त्यांचा अर्धा केस कापून चप्पलाचा हार घालून परिसरात धिंड काढल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे, हे दोन्ही मुलं 8 आणि 9 वर्षाचे आहेत. केस कापून धिंड काढल्यावर ते थांबले नाही तर या दोन्ही मुलांचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर वायरल केले. मुलांची आईने पोलिसात तक्रार दिली असता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मध्ये शनिवारी 10 च्या सुमारास हे दोघे मुले घरा बाहेर खेळत होते मात्र जवळ असलेला किरणांचा दुकानात चकली चोरी केली, म्हणून दुकान मालक असलेले दोघे भाऊ इरफान आणि तबकल पठाण या नराधमांनी या दोन्ही लहान मुलांना चकली चोरताना पकडले आणि त्यांचा अर्धा केश कापले, चपलांचा हार घातला, परिसरात या लहान मुलांची नग्न धिंड हि काढली, एवढेच नव्हे तर इरफान या मुलांना मारहाण करत होता तेंव्हा त्याचा भाऊ तबकल पठाण या सर्व कृत्याचा मोबाईल मध्ये रिकार्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. दोन्ही मुलांची आई जेंव्हा कामावरून संध्याकाळी घरी आल्या तेंव्हा त्यांना हा सर्व प्रकार कळलं, त्याच वेळी दोन्ही मुलांची आई न थेट पोलीस ठाणे गाठलं आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितले. दरम्यान या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी तातडीने या दोन नराधम भावा विरोधात पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली असून या घाणेरड्या कृत्या मध्ये आजून कोणी आरोपी आहे का या बाबत पुढील तपास सुरु केलाय.


Next Story
Share it
Top
To Top