चोरांनी केली पोलीसांवर दगडफेक

चोरांनी केली पोलीसांवर दगडफेक

गौतम वाघ

चोरटयांचा पाठलाग, ७ जणांवर झडप

अंबरनाथ - नवीन बिल्डींगच्या कंस्ट्रक्शनच्या ठिकाणी लोखंडी सळया चोरी करित असणा-या सातजणांच्या टोळीने पोलीसांवर दगडफेक करीत पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलीसांनी थरारक पाठलाग करुन. सातजणांच्या टोळीला मुददेमालासह झडप घालून ताब्यात घेतल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ए.एस.आय. काटवटे व पोलीस कॉन्स्टेबल गोडबोले हे आनंदनगर पोलीस चौकी परिसरात रात्री बीट मार्शल करत होते. त्यावेळी रात्री अडीजच्या सुमारास अंबरनाथ पूर्व येथील रॉयल पार्क जवळ नवीन बिल्डींगच्या कंस्ट्रक्शनच्या ठिकाणी काही टोळी लोखंडी सळया चोरी करून ट्रकमध्ये भरत असताना पोलीसांनी पाहिले. त्यांना हटकले असता त्या सातजणांच्या टोळीने पोलीसांवर दगडफेक केली. त्यात पोलीस बालबाल बचावले. त्यांनी या घटनेची खबर डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल भोसले, खेडकर, पोलीस हवालदार निरगुडा यांना देताच त्यांनी त्वरित त्याठिकाणी येवून चोरटयांचा थरारक पाठलाग करुन. पोलीसांनी १ लाखाच्या लोखंडी सळया, १० लाखाचा ट्रक असा ११ लाखाचा मुददेमाल जप्त करून इशरार मण्यार (५५), प्रल्हाद शिंदे (३३), दिलीप गोडबोले (२७), पप्पू चंदाणे (३०), संतोष शिंदे (३०), अमर तायडे (२६), विष्णू परधने (४०)या सातजणांना ताब्यात घेतले. पंकज भानुशाली याने दिलेल्या फिर्यादीवरून त्या सातजणांविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निरगुडा करीत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top