चौघांनी केली डॉ. पानसरेंची हत्या

चौघांनी केली डॉ. पानसरेंची हत्या

कोल्हापूर - ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या ४ जणांनी केली आहे. या मारेकऱ्यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पानसरे यांच्या घराशेजारी रेकी केली होती, अशी माहिती सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात दिली. न्यायालयात सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना ही माहिती देण्यात आली.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालय यावर उद्या म्हणजेच शनिवारी निर्णय देणार आहे. त्याचबरोबर डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी २ समान पिस्तूलांचा वापर झाल्याची माहितीही निंबाळकर यांनी दिली आहे. तर आतापर्यंत सनातन संस्थेचे साधक रुद्र पाटील, सारंग अकोळकर,विनय पवार हे फरार असल्याने समीरला जामीन दिला तर तो ही फरार होऊ शकतो, असा युक्तीवाद निंबाळकर यांनी न्यायालयात केला आहे.


Next Story
Share it
Top
To Top