छगन भुजबळांची 300 कोटींची संपत्ती जप्त

छगन भुजबळांची 300 कोटींची संपत्ती जप्त

मुंबई: राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सध्या बेसुमार संपत्तीप्रकरणी जेलची हवा खात असलेल्या छगन भुजबळांना आयकर विभागाने आणखी एक दणका दिला आहे. भुजबळ कुटुंबीयांची तब्बल ३०० कोटींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. जवळपास ४८ बनावट कंपन्यांच्या मदतीने ही संपत्ती जमवण्यात आली होती. अशी धक्कादायक माहिती आयकर विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी आयकर विभागानं नव्यानं छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटीसा बजावल्या आहेत. या कारवाईदरम्यान नाशिक आणि मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणावर असलेल्या संपत्तीवर टाच आणली आहे.

https://www.facebook.com/mahabatmi365/


Next Story
Share it
Top
To Top