छगन भुजबळ दीड वर्षानंतर तुरूंगाबाहेर येणार

छगन भुजबळ दीड वर्षानंतर तुरूंगाबाहेर येणार

मुंबई राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी छगन भुजबळ यांना मतदान करण्यासाठी परवानगी पीएमएलए न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे जवळपास दीड वर्षानंतर मतदानासाठी ते तुरूंगाबाहेर येणार आहेत. 17 जुलै रोजी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपल्याला विधिमंडळात जाऊन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पीएमएलए कोर्टाकडे केली होती. भुजबळांच्या या विनंती अर्जाला ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी विरोध केला होता. भुजबळांच्या विनंती अर्जावर सोमवारी सुनावणी झाली, यावेळी त्यांना परवानगी देण्यात आली.


Next Story
Share it
Top
To Top