जन्मदात्या आईनेच 21 दिवसाच्या मुलीची केली हत्या

  • मुंबई जन्मदात्या आईनेच २१ दिवसाच्या मुलीची हत्या केल्याची मन हेलावणारी घटना पवईत घडली. शवविच्छेदनाच्या अहवालात तिची हत्या झाल्याचे स्पष्ट होताच शुक्रवारी पवई पोलिसांनी आईला बेड्या ठोकल्या आहेत. मीना जयस्वाल (२३) असे आईचे नाव आहे.पवई येथील मिलिंद नगर परिसरात मीना जयस्वाल पत्नी आणि मुलीसोबत राहत होती. तिच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. पती गारमेंटमध्ये कामाला आहे, तर ती गहिणी आहे. पहिली मुलगी झाली म्हणून ती नाराज होती. अशात दुसऱ्या वेळी तरी वंशाचा दिवा म्हणून मुलगा व्हावा अशी अपेक्षा तिला होती. आणि मुलगाच होणार या आनंदात असताना दुसरीही मुलगी झाली. तिचा जन्म झाल्यापासून तिने तिच्याकडे दुर्लक्ष केले. ७ तारखेला ती २१ दिवसाची पूर्ण झाली. पती कामावर गेल्याने तिने तिच्या हत्येचा डाव रचला. मीनाने २१ दिवसाच्या मुलीचे नाक तोंड दाबून जमिनीवर डोके आपटून तिची हत्या केली. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच ती शांत झाली.

    त्यानंतर अटकेच्या भितीने तिने मुलगी खाटेवरुन पडून जखमी झाल्याचे सांगून तिला राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूृवीच तिला मत घोषित करण्यात आले. मुलीच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शुक्रवारी पवई पोलिसांनी मीनाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. तिच्या चौकशीत वरील बाब उघड झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक बी. के. महाडेश्वर यांनी दिली.


Next Story
Share it
Top
To Top