जेव्हा 900 किलो टोमॅटोची चोरी होते

जेव्हा 900 किलो टोमॅटोची चोरी होते

मुंबईः पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाल्याचे दर गगणला भिडतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. मुंबई- पुण्यात टोमॅटोचे दर तर शंभरी पार गेले आहेत, अशा आणिबाणीच्या परिस्थितीत टोमॅटो पळवण्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. दहिसर पोलीस हद्दीतील अविनास कंपाऊंडमधील भाजी मार्केटमधून चक्क 900 किलो टोमॅटोची चोरी झाली आहे. चोरी झालेल्या टोमॅटोची किंमती लाखोंच्या घरात असून हा माल कोणी चोरला आहे, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. त्याचे कारण म्हणजे चोरीला गेलेले टोमॅटो बाजारात विक्रीला गेले असण्याची शक्यता असून ते ग्राहकांनी खरेदी करून फस्तही केले असणार त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांसमोर मोठा पेच उभा राहणार आहे. व्यावसायिक स्पर्धेतून ही चोरी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी चोरांचा छडा लावणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.


Next Story
Share it
Top
To Top