चंद्रपूर भाजप पदाधिकारी रविंद्र बावनथडे ट्रॅव्हेल्समध्ये प्रवासदरम्यान सेक्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. त्यानंतर तरूणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी रविंद्र याच्यावर गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रविंद्र बावनथडेनी तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे केले असे तरूणींने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी भाजप पदाधिकारी रविंद्रला अटक केली आहे. नागपूर गडचिरोली मार्गावर चालणारी एआरबी कंपनीच्या धावत्या ट्रव्हल्समध्ये रविंद्र याने एका युवतीसोबत मागील सीटवर अश्लील चाळे करत होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाली होती. व्हिडीओमधील व्यक्ती रविंद्र बावनथडे हाच असल्याचे अनेकजण व्हाट्सअॅपवर बोलून दाखवत होते.याप्रकरणी जेव्हा तरूणीला माहिती मिळताच पोलिसांकडे तक्रार दिली.
चालत्या बसमधील सेक्स व्हिडीओ, भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा https://www.mahabatmi.com/?p=6806