डोळ्यात मिरची टाकून पेट्रोल पंप लुटला

अभिराज उबाळे

माळशिरस - माळशिरस तालुक्यातील

सदाशिवनगर येथील शंकर कारखान्याच्या पेट्रोल पंपाची सव्वा चार लाखाची रक्कम चोरीस गेली आहे . चोरटय़ांनी डोळ्यात चटणी टाकून हि रक्कम लंपास केली आहे.

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर जमा झालेली ४ लाख १८ हजाराची रक्कम कारखान्याच्या ऑफिसमध्ये जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचा-यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पुड टाकुन रक्कम पळवुन नेल्याची घटना कारखाना गेटवर घडली. या बाबत अज्ञात चोरांविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदाशिवनगर येथे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा पेट्रोल पंप आहे . या पंपावर डिझेल व पेट्रोल विक्रीतुन जमा झालेली रक्कम पेट्रोल पंप बंद झाल्यावर कारखाना ऑफीस मध्ये जमा करण्यात येते ही रक्कम जमा करण्यासाठी घेऊन जात असताना . ने कारखाना गेटजवळ आले असता, काळ्या रंगाची नंबर नसलेली पल्सर मोटार सायकल त्यांना आडवी आली व त्या मोटार सायकलने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिली व पल्सर मोटार सायकल वरील तोंडावर मास्क घातलेल्या दोन इसमांनी अर्जुन मिसाळ व सुरज जाधव यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड टाकली त्यामुळे ते दोघे मोटार सायकल वरुन खाली उतरले दरम्यान पल्सर मोटार सायकल वरील दोघां चोरांनी रक्कम असलेली पेटी घेऊन पलायन केले.


Next Story
Share it
Top
To Top