तरुणीचे शौचालयातील क्लिप व्हायरल करणारा अटकेत

तरुणीचे शौचालयातील क्लिप व्हायरल करणारा अटकेत

मुंबई - विक्रोळीतील पार्कसाइट येथील एका सोसायटीतघृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. नैसर्गिक विधीसाठी घरातील शौचालयामध्ये गेलेल्या तरुणीचाएका २७ वर्षीय विकृताने पाइपावर चढून व्हिडीओबनविला आणि सोसायटीच्या ग्रुपवर टाकला. पार्कसाइट पोलिसांनी या विकृताला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पार्कसाइट परिसरातील गांधीनगरमधील नामांकित सोसायटीत २३ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. याच सोसायटीत लखन श्रीपत माने (२७) हाऊस कीपिंगचे काम करतो. त्याची या तरुणीवर वाईट नजर होती. काही दिवसांपूर्वी ही तरुणी तिसऱ्या मजल्यावरील आपल्या घरातील शौचालयात नैसर्गिक विधीसाठी गेली असता लखनने ड्रेनेज पाइपवरून चढून खिडकीतून मोबाइलमध्ये तिची व्हिडीओ क्लिप काढली आणि सोसायटीचे पदाधिकारी आणि हाऊस कीपिंगचे काम करणाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकून तिची बदनामी केली. या कृत्याची माहिती ग्रुपमधील एकाने संबंधित तरुणी व तिच्या घरच्यांना दिल्यानंतर पार्कसाइट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.


Next Story
Share it
Top
To Top