तरूणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणा-या व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

मुलुंडमधील एका व्यवसायीकाने तरूणीचे कपडे बदलतानाचे फोटो सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देत 25 लाखांची खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रम होले असे व्यवसायीकाचे नाव असून त्याच्याविरोध्दात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वरळी परिसरात तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहाते. मे २०१५ मध्ये होलेने तिचे कपडे बदलतानाचे फोटो काढले. त्यानंतर, तरुणीला धमकाविण्यास सुरुवात केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्याकडून शारीरिक संबंधासह २५ लाखांच्या खंडणीची मागणी केली.

भीतीने तरुणी त्याला टाळत होती. मात्र, तरीदेखील त्याने तिच्यामागे पैशांसाठी तगादा लावला होता. होले हा व्यावसायिक असून, मुलुंडचा रहिवासी आहे. गेली दोन वर्षे तो तिला ब्लॅकमेल करत होता. अखेर तिने दोन्ही गोष्टींना नकार दिल्यानंतर, त्याने तिच्या फेसबुक अकाउंटवर अश्लील चित्र आणि मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. तरुणीने तत्काळ वरळी पोलीस ठाणे गाठून होलेच्या अत्याचाराला वाचा फोडली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी होलेविरुद्ध विनयभंग, खंडणी, धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली


Next Story
Share it
Top
To Top