तो सिनेमा पाहून आला, काही वेळात रेल्वेरुळावर मृत्यू

जळगाव- शहरातील सिनेमागृहात सिनेमा पाहून घरी आल्यानंतर कपडे बदलवून पुन्हा रात्री घराबाहेर पडलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा रेल्वे रुळालगत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नरेश राजेंद्र बाविस्कर (वय 19, रा. कांचन नगर) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यू कसा झाला, याचा उलगडा होत नाही. नरेश हा शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता सिनेमा पाहण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. सिनेमापाहून आल्यानंतर रात्री बारा वाजता घरी आला. त्यानंतर घरात कपडे बदल केले व नंतर गल्लीत मित्रांसोबत दीड वाजपर्यंत गप्पा केल्या. यावेळी घरातील सर्व लोक झोपी गेलेले होते. सकाळी नरेश घरात दिसला नाही व त्याच्या मोबाईलवरही संपर्क होत नसल्याने कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतला असता प्रजापत नगराजवळ भुसावळ मार्गावर रेल्वे खांब क्र.421/1 ते 420/33 दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली की त्याची काही कारणस्तव हत्या करण्यात आली, याचा पोलिस तपास करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top