दरोडेखोरांनी भोकर येथील पळविलेली कार अहमदपुर बस स्थानकात सापडली

दरोडेखोरांनी भोकर येथील पळविलेली कार अहमदपुर बस स्थानकात सापडली

उत्तम बाबळे

भोकर :- भोकर येथील प्रफुल्ल नगर निवासी नगरसेविका झरीना बेगम शे.युसूफ यांच्या घरी धाडसी दरोडा टाकून लाखो रुपयाच्या एैवजासह दरोडेखोरांनी त्यांची कार ही पळविली होती.ती कार अहमदपुर बस स्थानकात सापडली असून पुढील तपास नांदेड स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकासह भोकर पोलिस करत आहेत. प्रफुल्ल नगर भोकर जि.नादेड येथील सामाजिक कार्यकर्ते शे.युसूफ व त्यांच्या पत्नी नगरसेविका झरीना बेगम शे.युसूफ यांच्या घरी दि.२२ मार्च रोजी पहाटे २:०० वाजताच्या दरम्यान ८ दरोडेखोरांनी छतावरुन घरात प्रवेश करुन शे.युसूफ शे.मैनोद्दीन यांना एका खुर्चीला बाधून त्यांच्या गळ्यावर तलवार ठेऊन त्यांची आई,पत्नी व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण करुन घरातील सोन्या चांदीचे दागीणे व रोख रक्कमेसह लाखोचा एैवज हस्तगत केला.तसेच शे.युसूफ यांच्या मालकीची कार क्र.एम.एच.२६ ए.के.९२२० ची चावी मागून घेऊन एैवजांसह त्या कारने दरोडेखोरांनी पलायन केले होते.या धाडसी दरोड्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.शे.युसूफ शे.मैनोद्दीन यांनी भोकर पोलिसांत रितसर तक्रार दिल्यावरुन त्या दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.दरोडेखोरांचा शोध घण्याचे पोलिसांपुढे एक प्रकारे आव्हानच उभे टाकल्याने त्यांच्या शोधार्थ नांदेड स्थानिक गुन्हा अन्वेशन चे दोन व भोकर पोलिसांचे एक पथक गतिमान झाले होते.दरम्यान २७ मार्च रोजी अहमदपुर जि.लातूर पोलिस ठाण्यातून पो.नि.चाऊस व पो.उप.नि.प्रविण उदय यांनी ती कार राज्य परिवहन मंडळाच्या अहमदपुर बस स्थानकात आढळल्याचे भोकर पोलिसांना कळविले.त्यानुसार पो.नि.संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.चव्हाण व या गुन्ह्याचे तपासनिक आमलदार जमादार एन.एम.जाधव हे नांदेड येथील स्थानिक गुन्हा अन्वेशन,हस्तरेषा ठसे तद्न्य पथकासह तपासकामी अहमदपुर येथे गेले.यांनी ती कार ताब्यात घेऊन तपासली असता दरोडेखोरांनी या गुन्ह्यात वापरलेले काही आक्षेपार्य वस्तू सापडल्या.याबाबद पो.नि.संदिपान शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,गुन्हेगारांनी वापरलेली कार वकाही आक्षेपार्य वस्तू सापडल्या असून त्यावरुन दरोडेखोरांचा शोध घेण्याचे पर्याय पुढे आले आहेत. लवकरच त्या दरोडेखोरांचाही शोध नक्कीच घेऊ. पुढील तपास जमादार एन.एम.जाधव हे करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top