धुळ्यात कुख्यात गुंडाला घातल्या गोळ्या

धुळ्यात कुख्यात गुंडाला घातल्या गोळ्या

धुळेः बाप्पू म्हणून धुळ्यात कुप्रसिद्ध असलेल्या एका गुंडाचा गोळ्या घालून खात्मा करण्यात आला. मंगळवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. शहरातील कराचीवाला चौकातील गोपाल टी स्टॉलसमोर ही घटना घडली. गुड्ड्या असे या गुंडाचे नाव आहे. टोळी युद्धातून त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहीती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूसे जप्त केली आहेत. गुड्ड्यावर धुळे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.


Next Story
Share it
Top
To Top