नगर:विषारी दारु विक्रीमुळे मृत्युस कारणीभुत असलेले ३ जण नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

उत्तम बाबळे

विषारी दारु सेवनामुळे ९ जणांचा गेला बळी तर अद्यापही ११ जण अत्यावस्थ

नांदेड : - जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार धुमाळीत अहमदनगर जिल्ह्यात कांही उमेदवारांनी मतदारांना विषारी दारु वाटली व ती सेवन केल्यामुळे ९ जणांचा नाहक बळी गेला आणि ११ जण अद्याप ही अत्यावस्थ आहेत.सदरील प्रकरणी एम.आय.डी.सी.पोलिस ठाणे अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील ३ फरारी मुख्य सुत्रधारांना नांदेड पोलिसांनी जेरबंद केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात नुकत्याच संपलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणूक दरम्यान बेकायदेशीररित्या तयार केलेली विषारी दारु काही उमेदवारांनी खरेदी केली. ती दारु सेवन करणाऱ्यांपैकी ९ जणांचा मृत्यू झाला आणि ११ जण अद्याप अत्यावस्थ अवस्थेत आहेत. या प्रकरणी एम.आय.डी.सी.पोलिस ठाणे अहमदनगर येथे गुरन ३७/२०१७ कलम ३०४,३२८,३४ भादवि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्यायातील कांही जणांना अटक करण्यात आली तर कांही मुख्य सुत्रधार फरारी झाले.याच फरारी पैकी कांही जण नांदेड येथे लपुन बसल्याची गुप्त माहीती नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक संजय येनपुरे यांना मिळाल्यावरुन दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे नांदेड पोलिसांनी सचखंड गुरुव्दारा गेट नं.२ जवळील डिंपलसिंग नवाब लॉजमध्ये साफळा रचुन आज दि.१८ फेब्रुवारी २०१७ रोजी छापा मारला असता संदीप मोहन दुगल (२८), मोहन श्रीराम दुगल (६०) आणि वैभव जयसिंग जाधव (३०) हे ३ जण रुम नं.१० मध्ये संशयास्पद हालचालीसह सापडले.या ३ जणांना जेरबंद केले असता हे सर्व जण अहमदनगरमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार असल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले.यावेळी त्यांच्याकडे व्हीडीआय स्विफ्ट एम.एच.१६ बी.एच.५२४१ क्रमांकाची कार व मोबाईल आढळून आले.पळून आलेली ही कार व मोबाईल पोलिसांनी जप्त केले.

नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक संजय येनपुरे, अपर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, सहायक पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे, पोलीस हवालदार जसवंतसिंघ शाहू, दशरथ जांभळीकर, दत्राता वाणी ,रामदास श्रीमंगले, पांडूरंग जिनेवाड, सदाशिव आव्हाड, तानाजी मुळके यांच्या पथकाने या विषारी दारु प्रकरणातील तीन जणांना पकडले आहे. पकडण्यात आलेल्या या ३ जणांची माहीती नांदेड पोलिसांनी एम.आय.डी.सी.पोलिस ठाणे,अहमदनगर यांना दिली.यावरुन त्या ठाण्याचे पो.नि.राहुल पाटील हे नांदेड येथे आपल्या ताफ्यानिशी नांदेड येथे आले असता त्या तिघांना नांदेड पोलिसांनी पुढील तपासासाठी अहमदनगर पोलिसांच्या स्वाधिन केले.


Next Story
Share it
Top
To Top