नगर दारूकांडातील बळींची संख्या सात वर

नगर दारूकांडातील बळींची संख्या सात वर

  • हॉस्पिटलच्या कँन्टीनमध्येच बनावट दारुचा अड्डा

नगर - जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील कँन्टीनमध्ये बनावट दारूचा कारखानाचं असल्याचं बुधवारी उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी कँटिनचालक माजी नगरसेवक जितू गंभीरसह तथाकथित पत्रकार जाकीर शेख त्याचा साथीदार हनिफ शेख अशा तिघांना अटक केली. आरोपींना आज कोर्टात हजर करण्‍यात येणार आहे. दुसरीकडे, पांगरमल येथील दारूकांडातील एकाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहदेव आव्हाड असे मृत व्यक्तीचे नाव दाहे. मृतांचा आकडा 7 वर गेला आहे.

बुधवारीही दोघांचा मृत्यू झाला होता. ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आणखी सहा जणांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. नगर तालुक्यातील पांगरमल येथे एका राजकीय नेत्याने दिलेल्या पार्टीत बनावट दारुचे सेवन केल्याने पोपट रंगनाथ आव्हाड, राजेंद्र खंडू आव्हाड, दिलीप रंगनाथ आव्हाड प्रभाकर पेटोरे या चौघांचा सोमवारी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मंगला आव्हाड, भीमराव आव्हाड, रावसाहेब आव्हाड, महादेव आव्हाड, भाग्यश्री मोकाटे गोविंद मोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना हिरोजी नाना वाकडे आणि राजेंद्र भानुदास आव्हाड या आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बनावट दारुतील बळींची संख्या सहावर गेली होती. या प्रकरणी भीमराव आव्हाड याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

हॉस्पीटलच्या कँन्टीमध्येच बनावट दारू

सिव्हिलमधील साईभूषण नावाच्या कँटीनवर छापा टाकला. बनावट दारु तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याबरोबरच विविध कंपन्यांच्या रिकाम्या दारुच्या बाटल्या, बूच, प्लास्टिक कव्हर, अल्कोहोलसदृश रसायनाच्या बाटल्या, चॉकलेटी फूड कलर, बॉबी संत्रा ब्रँडच्या बाटल्या आढळून आल्या. हा माल पोलिसांनी जप्त केला.


Next Story
Share it
Top
To Top