नयना पुजारी बलात्कार-हत्या प्रकरणी तिघेजण दोषी

नयना पुजारी बलात्कार-हत्या प्रकरणी तिघेजण दोषी

पुणे - महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणात विशेष न्यायाधीश एल.एल येनकर यांनी तीन जणांना सोमवारी दोषी ठरविले. सात वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला.

योगेश अशोक राऊत (वय 24 रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 24, रा. सोळू, खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय 26, रा. दिघी, मूळ रा. सातारा) या आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. या गुन्ह्यातील आरोपी राजेश पांडुरंग चौधरी हा माफीचा साक्षीदार झाला.

आरोपींविरुद्ध अपहरण, बलात्कार, खून करणे, चोरी करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते. चौधरी याचा फौजदारी दंड संहिता कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेला जबाब, विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी 37 जणांची नोंदविलेली साक्ष, आरोपींविरुद्ध पोलिसांनी सादर केलेला भक्कम परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावा, आरोपी आणि पीडित पुजारी यांना एकत्रित पाहणाऱ्यांची साक्ष अशा मुद्यांच्याआधारे आरोपींनीच हा गुन्हा केल्याचे सिध्द झाले.

ऑक्‍टोबर 2009मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. पुजारी यांचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता. त्यांच्या चेहऱ्यावर दगड मारून विद्रूप केला गेला होता. तत्पूर्वी त्यांच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर एका आठवड्याच्या आत अटक केली होती.


Next Story
Share it
Top
To Top