नांदेड जिल्ह्यात ५ ते ३० जुलै दरम्यान फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन

नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे यांच्या मार्गदर्शनानुसार "न्याय आपल्या दारी" या योजनेंतर्गत नांदेड जिल्हयात ५ ते ३० जुलै २०१७ या दरम्यान फिरते लोकन्यायालय व फिरते कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या न्यायरथाची सुरवात जिल्हा न्यायालय नांदेड येथे ५ जुलै २०१७ रोजी सकाळी दहा वाजता होणार असून या उद्घाटन सोहळयानंतर हे फिरते न्यायालय पुढे मार्गस्थ होणार आहे.

यावेळी आपसातील वाद असलेली दाखल पुर्व प्रकरणे तसेच प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र असे फौजदारी प्रकरणांमध्ये आपसात तडजोड करून कायमची निकाली काढणार आहेत. याचा एक मुख्य फायदा म्हणजे निकाली निघालेल्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंच्या पक्षकरांना कुठल्याही प्रकारचे अपील करता येत नाही. सर्व पक्षकार बांधवांनी आपले आपसातील वाद कायमचे मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयामध्ये जावून आपले प्रकरण फिरत्या लोकन्यायालयामध्ये ठेवण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे, सचिव डी. टी. वसावे तसेच सर्व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सर्व न्यायाधीश यांनी केले आहे.


Next Story
Share it
Top
To Top