नांदेड पोलीसांनी प्रतिज्ञा घेऊन दहशदवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा केला

नांदेड पोलीसांनी प्रतिज्ञा घेऊन  दहशदवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा केला

उत्तम बाबळे

उत्तम बाबळे

नांदेड :- २१ मे रोजी होणारा दहशदवाद व हिंसाचार विरोधी दिवस रविवारची सुट्टी असल्याच्या कारणाने नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात २९ मे रोजी नांदेड पोलीसांनी सामुहिक प्रतिज्ञा घेऊन साजरा केला आहे.

प्रतिवर्षी २१ मे रोजी दहशतवाद व हिसाचार विरोधी दिवस पाळल्या जातो.परंतू यावर्षी २१ मे रोजी शासकिय सुट्टी आल्यामुळे २० मे २०१७ रोजी सकाळी ११:०० वाजता नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी सामुहिक प्रतिज्ञा घेऊन हदशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा केला.या प्रतिज्ञेत दहशतवाद व हिंसाचाराचे कृत्य करणा-या प्रवृत्ती विरोधी प्राणाची बाजी लाऊन सदैव लढा लढू व नागरीकांचे संरक्षण करु अशी शपथ घेण्यात आली.

यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ (भोकर),उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर (इतवारा,नांदेड),स्थानिक गुन्हा शाखा नांदेडचे पो.नि.संदिप गुरमे यांसह बहुसंख्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Next Story
Share it
Top
To Top