नागपूरमध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपूरमध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपूर – गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत चाललीय. आमदार निवासातील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच येथील एका अल्पवयीन मुलीवर अल्ववयीन मुलाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

नागपुरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडल्याचे आज (सोमवार) समोर आले आहे. या प्रकरणी फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी संबंधित अल्पवयीन आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 363 आणि 376 यांसह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

पीडित 16 वर्षीय मुलगी मैत्रिणीच्या भावाच्या स्वागत समारंभासाठी गेली असता, तिला घरी सोडून देतो असे सांगून आपल्या घरी घेऊन तिच्यावर बलात्कार केला. नागपुरात गेल्या पाच दिवसांत घडलेली ही अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मागील आठवड्यात आमदार निवासात एका मुलीवर बलात्कार झाला. तसेच, एका प्राध्यापकाने हॉल तिकीट देण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकारही समोर आला होता.


Next Story
Share it
Top
To Top