पतीने मित्रासोबत पत्नीला पकडले बेडरूममध्ये

पतीने मित्रासोबत पत्नीला पकडले बेडरूममध्ये

मुंबई- मित्रासोबत पत्नीला बेडवर पकडल्यानंतर संबंधित मित्रावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्या मित्रासोबत पतीने रंगेहाथ पकडले त्याच मित्रावर महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजा-यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. आरोपी तक्रारदार महिलेचा मित्र असून तो अनेकदा तिच्या घरी येत असे अशी माहिती शेजा-यांनी दिली आहे. आरोपी तरुण सध्या फरार आहे.

महिलेचा पती काही कामानिमित्त रात्री बाहेर गेला होता. मात्र आणप काहीतरी विसरलो असल्याचं त्याला अचानक आठवलं, आणि त्यासाठी तो पुन्हा घरी आला. घरी पोहोचला असता आपल्या रुममध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती असल्याचे त्याच्या लक्षात आले. आपण अडचणीत सापडणार असे लक्षात येताच महिलेने आपल्यावर बलात्कार होत असल्याची आरडाओरड करायला सुरुवात केली. यानंतर महिलेच्या पतीने त्याला पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मित्राने आपले कपडे गोळा केले आणि तिथून तसाच पळ काढला.

महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. माझे सासू-सासरे झोपले होते पतीसाठी दरवाजात उघडा ठेवला असताना ही अनोळखी व्यक्ती घरात शिरली असा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. संबंधित तरुणावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.


Next Story
Share it
Top
To Top