पालकमंत्री राम शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने केला तरूणीवर लैंगीक अत्याचार

अहमदनगर - नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलिस कर्मचा-यावर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामदास अकोलकर असे आरोपीचे नाव असून तो नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

आरोपी अकोलकर सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अकोलकरने पीडित तरूणीची ओळख वाढवून गेल्या सहा महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. त्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला. आरोपी अकोलकर विवाहीत असून पीडित युवती नगरमध्ये शिक्षणासाठी आली होती.

या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने पोलिसांत धाव घेतील. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर तिने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशन येथे मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.


Next Story
Share it
Top
To Top